हिंगोली(hingoli):- जलेश्वर तलावाच्या गाळ उपसा, संरक्षण भिंत व रस्त्याच्या कामाची पाहणी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी ३१ मे रोजी केली असून तलावाचे काम गतीने करण्याच्या सूचना कंत्राटदाराला(contractor) दिल्या.
तलावालगत संरक्षण भिंतही उभारली जात आहे
हिंगोली शहरातील जलेश्वर तलावातून प्रत्येक दिवशी टिप्पर व ट्रॅक्टरमधून (Tipper and tractor) गाळ उपसा केला जात आहे. तसेच तलावालगत संरक्षण भिंतही उभारली जात आहे. अंबिका टॉकीज पासून रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. जूनमध्ये लवकरच पाऊस(rain)सुरू होणार असल्याचे संकेत असल्याने तलावातील गाळ उपसा(Sludge removal) जोमाने करण्याच्या सूचना आ.मुटकुळे यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अरविंद मुंढे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक, चंदू लव्हाळे, अॅड.के.के.शिंदे, शाम खंडेलवाल, मनोज शर्मा, कृष्णा ढोके, अक्षय लव्हाळे, दिनेश बगडीया, बाबा घुगे, रजनीश पुरोहित यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.