पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील शेतकरी; ताडकळस पोलीसात गुन्हा नोंद
परभणी (Farmer Suicide Case) : सततची ना पिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत एका ३४ वर्षीय शेतकर्याने विषारी द्रव प्राषण केले. उपचारादरम्यान सदर शेतकर्याचा मृत्यू झाला. मयत शेतकरी हा पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील रहिवाशी आहे. या प्रकरणी ४ नोव्हेंबरला ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यशवंत राधाकिशन माने वय ३४ वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. याबाबत मयताचे वडील राधाकिशन माने यांनी पोलीसात खबर दिली आहे. शेतातील सततची ना पिकी आणि बँकेचे पिक कर्ज कसे फेडावे या विवंचनेत यशवंत यांनी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी (Farmer Suicide Case) परभणी येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ताडकळस पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोउपनि. काठेवाडे करत आहेत.
आजारास कंटाळून विषारी द्रव पिले
परभणी: आजारपणाला कंटाळून एका ७५ वर्षीय इसमाने विषारी द्रव प्राशन केले. उपचारादरम्यान सदर इसमाचा (Farmer Suicide Case) परभणी येथील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. बाबाराव दळवे रा.बोरी असे मयताचे नाव आहे. निवृत्ती दळवे यांच्या खबरीवरून बोरी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोउपनि.राठोड करत आहेत.