जळकोट (Farmers suicide Case) : लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील गुत्ती येथील वसंत दिगांबर केंद्रे वय ५५ वर्ष या अल्पबूधारक शेतकर्याने नापीकी व कर्जाला कंटाळून घरीच गळफास घेवून आत्महत्या दिनाक २६ नोंव्हेबर रोजी मंगळवारी सकाळी ६.३० वाजता, कडीला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. या शेतकर्याच्या नावावर सहकारी बँकेचे व खाजगी कर्ज आसल्याचे बोलले जात आहे. मागील दोन तीन वर्षापासुन या परिसरात सततची नापिकी त्याच बरोबर यावर्षी अतिवृष्टीने हाताला आलेले सोयाबिन चे मोठयाप्रमाणावर नूकसान झाल्याने हाताला आलेले उत्पन्न निघून गेले त्यामूळे हतबल होवून या शेतकर्याने गळफास घेवून (Farmers suicide Case) आत्महत्या केली आहे.
आशी माहीती अनंतराव केंद्रे यांनी दिली.गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहीती जळकोट पोलीस स्टेशनला मिळताच पोलिस प्रशासनाने पंचनामा केला आसून पुढील . तपासणीसाठी जळकोट येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आसून येथे (Farmers suicide Case) शवविच्छेदन करण्यात आले. यांच्यावर दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी गुत्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत यांच्या पश्चात पत्नी दोन मूले,दोन मुली सुना असा परिवार आहे.