परभणी/पाथरी (Parbhani):- मद्यपी पतीकडून होणारी मारहाण आणि त्रासाला कंटाळुन पत्नीने गळफास घेत आत्महत्या (Suicide)
केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात मंगळवार २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ज्योती सुरेश चिंचाने असे मयत महिलेचे नाव आहे. ज्योती यांचे लग्न सन २०११ मध्ये सुरेश चिंचाने यांच्या सोबत झाले. लग्ना नंतर काहि दिवस चांगले नांदविल्यानंतर पतीने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात कली. मद्यपी अवस्थेत मारहाण (Hitting)केली. याबाबत विवाहीतेने माहेरी सांगीतले होते. पतीचा त्रास वाढल्याने २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास ज्योती यांनी घरातील आडुला रुमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मयताचे भाव शंकर थोरात यांनी दिलेल्या फियादी वरुन सुरेश रामा चिंचाने यांच्यावर पाथरी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.