परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मंगळवाडी शेत शिवारातील घटना
परभणी (Parbhani farmer Suicide) : सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ५८ वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या (farmer Suicide) केली. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वस्सा, मंगळवाडी शेतशिवारात घडली. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परभणीतील बोरी पोलीसात नोंद
भागोजी देवराव काळे वय ५८ वर्ष रा.देवसडी ता.जिंतूर असे आत्महत्या केलेल्या (farmer Suicide) शेतकर्याचे नाव आहे. याबाबत विठ्ठल काळे यांनी खबर दिली आहे. त्यांचे वडील भागोजी काळे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. सदरचे कर्ज कसे फेडावे तसेच सततची नापीकी यामुळे भागोजी काळे सतत चिंतेत राहत होते. याच चिंतेत त्यांनी शेतातील चिंचाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोउपनि पंतोजी मोक अधिक तपास करत आहेत.
दरम्यान मागील दोन महिन्यात जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे (farmer Suicide) प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पन्न कमी येणार असल्याने शेतीवरील खर्च देखील निघणे अवघड होऊन बसले आहे. मानसीक तणावाखाली गेलेले शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.