पुसद (farmer suicide) : तालुक्यातील हुडी (बु.) येथील शेतकऱ्याने शेत कर्जाला कंटाळून आपल्या शेतातील झाडाला गळफास (farmer suicide) घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. (Pusad City Police) ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हुडी (बु.) येथील कर्जबाजारी शेतकरी तुकाराम ज्ञानेश्वर अडकिने वय 53 वर्ष यांनी शेती करिता विविध प्रकारचे कर्ज काढले होते.
सततची नापिकी अतिवृष्टी व गारपीट यामुळे शेत पिकातून उत्पन्न निघत नव्हते व कर्जाची फेड कशी करावी व प्रपंच कसा चालवावा या विवंचनेत ते होते शेवटी शेत कर्जाला कंटाळून आपल्या शेतातील सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना मृतक यांच्या मुलाने 112 नंबर वर ग्रामीण पोलिसांना कळविले. (pusad City council) ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदेश पवार व पोलीस कॉन्स्टेबल गंगमवार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पुसद (Pusad Hospital) येथे आणला.
मृतक तुकाराम अडकिने यांच्या मुलाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुकाराम हे दि. 9 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान घरून निघाले , अंदाजे 8ते 8.30 वाजता च्या दरम्यान मृतकाचा भाऊ शेतात ढोराला चारापाणी टाकण्यासाठी गेले असता , त्यांना शेतात तुकाराम अडकिने हे सागवान च्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती गावात पसरतात एकच खळबळ उडाली. (farmer suicide) आत्महत्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज असल्यामुळे केली असल्याचे गावात चर्चा सुरू आहे . मृतक तुकाराम ज्ञानेश्वर अडकिने यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली , पत्नी , तीन भाऊ , मृतकाचे आई-वडील असा मोठा आप्तपरिवार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली (pusad City council) ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमदार अधिक तपास करीत आहेत.