हिंगोली (Girl suicide Case) : वसमत तालुक्यातील पूर्णा कारखाना येथे तरूणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने २ सप्टेंबरला तरूणावर वसमत ग्रामीण पोलिसात (Vasmat Rural Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील पूर्णा कारखाना येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी (Girl suicide) वसमत कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी वर्गामध्ये शिक्षण घेत असताना याच भागातील गोरखनाथ बालाजी लुट्टे हा तरूण तिचा अधुनमधून पाठलाग करीत होताः परंतु ती त्या तरूणाकडे दुर्लक्ष करीत होती. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्या प्रेमाला नकार दिला तर तुला जिवे मारतो अशी धमकीच अल्पवयीन मुलीस दिल्याने गोरखनाथच्या या त्रासाला कंटाळून घाबरलेल्या मुलीकडून वारंवार प्रेमाचा होकार मिळविण्यासाठी दिला जाणारा त्रास व जिवे मारण्याची धमकी दिल्याने विद्यार्थीनी महाविद्यालयात जाण्याकरीता घाबरत होती.
१ सप्टेंबर रविवार रो मुलीचे वडील कारखाना येथे गेले होते तर आई घरी नसल्याने दुपारी ४ च्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Girl suicide) केली. काही वेळात तिची आई आल्यानंतर मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळताच सपोनि अनिल काचमांडे, जमादार विजय उपरे, एम. एम. सिद्दीकी, नामदेव बेंगाळ, रामेश्वर लोखंडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत मुलीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी (Vasmat Rural Police) वसमत ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गोरखनाथ लुट्टे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास अनिल काचमांडे करीत आहेत. वडील कारखाना येथे गेले होते तर आई घरी नसल्याने दुपारच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास (Girl suicide) घेऊन आत्महत्या केली. काही वेळात तिची आई आल्यानंतर मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळताच सपोनि अनिल काचमांडे, जमादार विजय उपरे, एम. एम. सिद्दीकी, नामदेव बेंगाळ, रामेश्वर लोखंडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत मुलीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी (Vasmat Rural Police) वसमत ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गोरखनाथ लुट्टे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अनिल काचमांडे करीत आहेत.