तिरोडा (Tiroda farmer) : गॅस पाईप लाईनच्या (Gas pipe line) सबस्टेशनसाठी तालुक्यातील पालडोंगरी येथील गेंदलाल सोमा बोपचे यांच्या कुटूंबाची जमिन निवडण्यात आली आहे. मात्र अधिग्रहनानंतर शेतकरी भुमिहिन होणार आहे. त्याच्या कुटूूंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने जमिन देण्यास नकार दिला. यामुळे अधिकारी, कर्मचार्याकडून त्याला दमदाटी दिली जात आहे. या प्रकाराला कंटाळून पिडित शेतकर्याने (Gondia Collector) जिल्हाधिकार्याकडे सामुहिक आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जमिन अधिग्रहणासाठी शेतकरी कुटूंबावर दडपण
माहितीनुसार, भुमिगत गॅस पाईप लाईन (Gas pipe line) योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान गॅस पाईप लाईनच्या (Gas Substation) सबस्टेशनसाठी गॅस कंपनी व संबधित प्रशासनाकडून पालडोंगरी येथील शेतकरी सोमा बोपचे यांची शेत जमिन मुकर्रर करण्यात आली. मात्र ज्या शेतकर्याची जमिन अधिग्रहीत करायची आहे. त्या शेतकर्याकडे दुसरी कुठलीही जमीन नाही. त्या शेत जमिनीवर (Tiroda farmer) शेतकरी बोपचे यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. ती जमिन अधिग्रहीत झाली तर शेतकर्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी सोमा बोपचे व सिंधू बोपचे यांनी अधिग्रहणाचा विरोध दर्शविला.
मागील दोन वर्षांपासून जमीन अधिग्र्रहणाचा प्रश्न रखडलेला असल्याने संबधित कंपनी (Gas Company) व काही अधिकारी त्या शेतकर्यावर दडपण आणत आहेत. दररोज एक ना एक अधिकारी शेतकर्याची भेट घेवून दमदाटीसह पोलिसांची धमकी देत आहेत. एवढेच नव्हेतर सदर जमिन द्यायची इच्छा असेल अथवा नसेल तरीही अधिग्रहीत तर होणारच, असाही दम देत आहेत. या प्रकाराला कंटाळून (Tiroda farmer) शेतकरी गेंदलाल सोमा बोपचे व सिंधू सोमा बोपचे यांनी जिल्हाधिकार्याला पत्र लिहून (Mass self-immolation) सामुहिक आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. (Gondia Collector) जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालून शेतकर्याला न्याय देणार का? याकडे लक्ष लागले आहे.