ओवैसी यांची जोरदार टीका…बघा VIDEO
नवी दिल्ली (Tirumala Tirupati Devasthanam) : AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम्सने (Tirumala Tirupati Devasthanam) 18 मंदिर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ओवेसी म्हणाले की, हे केले गेले कारण ते गैर-हिंदू आहेत, यामुळे खूप चुकीचा संदेश जात आहे. ओवैसी पुढे म्हणाले की, (Muslim Waqf Board) वक्फ बोर्ड मुस्लिमांसाठी खूप पवित्र आहे. त्यामुळे कोणत्याही गैर-मुस्लिमांना (Non-Muslims) त्याचा भाग बनवणे चुकीचे आहे.
ओवैसी यांनी आरोप केला की, जेव्हा (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडी कर्मचाऱ्यांना केवळ गैर-हिंदू (Non-Muslims) असल्याने काढून टाकले जात आहे. तेव्हा एन चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) वक्फ दुरुस्ती विधेयकाला कोणत्या आधारावर पाठिंबा देत आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, राज्य (Muslim Waqf Board) मुस्लिम वक्फ बोर्डात किमान दोन (Non-Muslims) गैर-मुस्लिम सदस्य असू शकतात. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ओवैसी म्हणाले की, यामुळे खूप चुकीचा संदेश जात आहे आणि एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा.”
#WATCH | Delhi: AIMIM MP Asaduddin Owaisi says, "…When the employees of TTD are being removed just because they are non-Hindu, then on what basis N Chandrababu Naidu led Telugu Desam Party is supporting Waqf Amendment Bill in which it is being said that in the state Muslim waqf… https://t.co/GU0xQuLaAg pic.twitter.com/8kvZJJiRfW
— ANI (@ANI) February 5, 2025
18 कर्मचाऱ्यांवर कारवाई, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही बंदी
खरंतर, टीटीडीने 18 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्यावर मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या धार्मिक परंपरांचे पालन केल्याचा आरोप होता. मंदिर व्यवस्थापनाने सांगितले की, हे कर्मचारी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते आणि गैर-हिंदू प्रथा पाळत होते. ज्यामुळे त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडीने म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना आता सरकारी विभागात स्थानांतरित केले जाईल किंवा ते स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत (VRS) निवृत्त होऊ शकतात. या कर्मचाऱ्यांना मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही मनाई करण्यात आली आहे.
टीटीडीचा युक्तिवाद: मंदिराचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे
मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणतात. त्यांनी सांगितले की, 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या बोर्ड बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडी बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. टीटीडी व्यवस्थापनाने सांगितले की, हे पाऊल टीटीडी कायद्याअंतर्गत उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये यापूर्वी तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी मंदिरात फक्त (Non-Muslims) हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल, असे (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडीने स्पष्ट केले.