तिरुपति (Tirupati laddu controversy) : जगातील सर्वात श्रीमंत भगवान श्री व्यंकटेश्वराच्या तिरुपती मंदिराच्या लाडूमध्ये (Tirupati laddu controversy) प्राण्यांची चरबी आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (CM Naidu) यांनी 17 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआरसीपी सरकारच्या कार्यकाळात तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. नायडूंच्या या गंभीर आरोपानंतर, जगन मोहन (Jagan Mohan) यांनी प्रतिनिधित्व केलेल्या वायएसआरसीपीने संतापाने न्यायालयात धाव घेतली आहे.
VIDEO | Tirupati laddu controversy: "…Mr N Chandrababu Naidu presented a report that said a sample was taken on the day he assumed power and this sample reported that there was beef and fish oil in the ingredients that were used to make the laddus in Tirupati. We don't… pic.twitter.com/6flKPOIHE5
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2024
वायएसआरसीपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (CM Naidu) यांनी ‘तिरुमला लड्डू प्रसादम’ (Tirupati laddu controversy) यांच्यावर केलेल्या आरोपांची माहिती दिली. यासोबतच प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या दाव्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. वायएसआरसीपीच्या वकिलांनी विनंती केली की, एकतर विद्यमान न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करावी. परंतु उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवार, 25 सप्टेंबरपर्यंत जनहित याचिका दाखल करण्याचे सुचवले आहे.
जाणून घ्या तिरुपती लाडू “प्रसादम” मध्ये चरबीचे काय आहे?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan) यांनी, गेल्या पाच वर्षांत वायएसआरसीपी सरकार (YSRCP Govt) आणि त्यांच्या नेत्यांनी तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात ढोंगीपणा दाखवला आहे. त्यांनी तिरुमला यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे.
तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचा वापर
सीएम चंद्राबाबू नायडू (CM Naidu) यांनी 17 जुलै रोजी एक अहवाल शेअर केला. हा अहवाल राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अन्न प्रयोगशाळेतील सीएएलएफचा आहे. ज्यामध्ये तिरुपती मंदिरात प्रसादासाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी (Tirupati laddu controversy) आणि माशाच्या तेलापासून बनवलेले तूप वापरण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात या गोष्टींची भेसळ आढळून आली आहे.