तिरुपती (Tirupati Laddu controversy) : तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या प्रसिद्ध हिंदू मंदिरात दिल्या जाणाऱ्या (Tirupati Laddu controversy) प्रसाद लाडूमध्ये गोमांस चरबीचा खुलासा झाल्याने करोडो भाविकांना मोठा धक्का बसला आहे. या खुलाशानंतर प्रचंड खळबळ उडाली असून, राजकीय चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी श्री व्यंकटेश्वर मंदिरातील प्रसादात चरबीच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेबाबत मोठे विधान केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसादाची विटंबना (Tirupati Laddu controversy) झाल्याची बातमी अस्वस्थ करणारी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशाच्या प्रशासनाने धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपले पाहिजे. हा मुद्दा प्रत्येक भक्ताला दुखावणार आहे आणि त्याचा सखोल विचार करण्याची गरज आहे.
The reports about the defilement of the Prasad at Sri Venkateshwara temple in Tirupati are disturbing.
Lord Balaji is a revered deity for millions of devotees in India and across the world. This issue will hurt every devotee and needs to be thoroughly looked into.
Authorities…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 20, 2024
काँग्रेस नेते खेडा यांचे मोठे वक्तव्य
दरम्यान, काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा म्हणाले की, जर विद्रुपीकरणाचे आरोप योग्य ठरले तर जबाबदारांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. तथापि, जर हे दावे खोटे किंवा गुप्त हेतूने प्रेरित असल्याचे सिद्ध झाले, तर (Tirupati Laddu controversy) तिरुपतीचे असंख्य भक्त त्यांच्या श्रद्धेचा अपमान सहजासहजी दुर्लक्षित करणार नाहीत. खेडा यांनी भाजपवर राजकीय फायद्यासाठी परिस्थितीचा गैरफायदा घेत निवडणुकीच्या काळात फुटीरतावादी कट सिद्धांत पसरवल्याचा आरोपही केला.
सीएम नायडू यांनी केला होता खुलासा
या प्रकरणाची सुरुवात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचे वक्तव्यने झाली. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या (Tirupati Laddu controversy) दाव्याला टीडीपीने सादर केलेल्या प्रयोगशाळेच्या अहवालामुळे आणखी बळकटी मिळाली. ज्यात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा समावेश असल्याचे सुचवले होते. दुसरीकडे वायएसआरसीपीने नायडूंवर राजकीय फायद्यासाठी बिनबुडाचे आरोप केल्याचा आरोप केला आहे.
लाडूच्या तुपात गोमांस चरबी आणि माशाचे तेल
या आरोपांना प्रत्युत्तर देताना, टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमणा रेड्डी म्हणाले की, श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या (Tirupati Laddu controversy) तिरुमला तिरुपती देवस्थानमने पुरवलेल्या तुपाचे नमुने गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेने तपासले होते. तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे प्रदान केलेल्या तुपाच्या नमुन्यांमध्ये “बीफ टॉलो,” स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी आणि फिश ऑइल आढळले. 9 जुलै 2024 रोजी सादर केलेल्या 16 जुलैच्या या प्रयोगशाळेच्या अहवालाने आधीच सुरू असलेल्या वादात आणखीनच भर पडली आहे.