धामणगाव रेल्वे (Tivara Accident) : शेतीच्या मशागतीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर चालकाचा रोटावेटर मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची (Tivara Accident) घटना तालुक्यातील तीवरा शेतशिवारात येथे बुधवार दि.५ जून रोजी घडली. किशोर शंकरराव मर्दाणे वय ३८ असे मृतक ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. माहितीवरून, तालुक्यातील तीवरा येथे राहणारा किशोर शंकराव मर्दाणे वय ३८ हा गावातीलच प्रफुल मुकुंदराव चौधरी यांचे एम एच २७ डी ए ६१२७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता.
तीवरा येथील धक्कादायक घटना
बुधवारी दिनांक ५ जून रोजी सकाळी दैनंदिन कामाप्रमाणे किशोर (Tivara Accident) तीवरा शेतशिवारातील विनोद भिमराव वानखडे यांच्या शेतात ट्रॅक्टर रोटावेटर घेऊन गेला. दुपारपर्यंत ट्रॅक्टरचे डिझेल संपले असावे म्हणून ट्रॅक्टर मालक चौधरी यांनी दुपारी १ दरम्यान त्याला कॉल केले मात्र बरेचदा फोन करूनही त्याने उत्तर दिले नाही.दरम्यान ट्रॅक्टर मालकाने शेतात येऊन बघितले असता किशोर शेती मशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला लागून असलेल्या रोटावेटर यंत्रात अडकून पडल्याचे त्यांना दिसून आले. (Tivara Accident) घटनेची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात (Amravati police) पोलीस कर्मचारी विनोद राठोड व विजयसिंग बघेल यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास बिट अंमलदार प्रफुल वानखडे यांच्यासह तळेगाव पोलीस करीत आहेत