तिवसा (Women Bail pola Competition) : बैलपोळ्याच्या सणानिमित्त आयोजित महिला बैलपोळा स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि बैल जोड्यांवर सरकार विरोधातील घोषणाबाजी आणि विविध संदेश देत आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात या बैलपोळ्यात जोरदार आग्रह धरण्यात आला. तिवसा तालुका कॉंग्रेस कमिटी व ॲड. यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या संयुक्त विदेयमाने आयोजित या बैलपोळ्याला खासदार बळवंत वानखडे आणि ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांच्यासह काँग्रेस समितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलपोळा हा पारंपरिक सण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (Bail pola) बैलपोळ्याच्या सणानिमित्त बैलांचे पूजन केले जाते. यावेळी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील देवराव दादा हायस्कूलच्या प्रांगणात महिलांच्या बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैलपोळ्याच्या सणाला 300 पेक्षा अधिक महिला धुरकरी आपल्या बैल जोडी सह सहभागी झाल्या होत्या. या बैलपोळ्यासाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यावेळी बोलताना तिवसा मतदार संघाच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलजोडी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
बैल जोडी ही आपल्या घरातील सदस्य असतात त्यामुळे दरवर्षी (Bail pola) बैलपोळ्याला आपण या बैल जोडीचे मनोभावे पूजन करतो. त्यांना विविध अलंकार आणि फुले अर्पण करून त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करतो. मात्र, आजच्या या बैलपोळ्याच्या मेळाव्यात महीला शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात असलेल्या आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. महागाई आणि शेतीला दाम मिळावे, बैल जोड्यांना अनुदान मिळावे, अशा अनेक मागण्या यावेळी महिला शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याचे (Adv. Yashomati Thakur) ॲड. ठाकूर म्हणाल्या.
बैलपोळा हा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मात्र, बैलपोळ्याच्या या सणाला अधिक आकर्षक आणि भव्य स्वरूप आजच्या या बैलपोळ्याच्या स्पर्धांच्या निमित्ताने आले होते. यावेळी बैल जोड्यांवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते. या बैलपोळ्याच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या बैल जोडीला 25 हजार रुपयांचे बक्षीस द्वितीय बैल जोडीला 15000 रुपयांचे तृतीय (Bail pola) बैल जोडीला 11000 तर चतुर्थ बैल जोडीला सात हजार रुपयांचे तसेच उपस्थित इतर सर्व बैलजोड्यांना २५०० रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी सामाजिक संदेश देणाऱ्या बैल जोड्यांना 5000 रुपये आणि स्मृतिचिन्ह प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.
यामध्ये उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारी बैलजोडी, लोकशाही आणि संविधान वाचवा संदेश देणारी (Bail pola) बैलजोडी, वाढती बेरोजगारी संदेश देणारी बैल जोडी, वाढते महिला अत्याचार बाबत संदेश देणारी बैल जोडी, सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणांचा संदेश देणारी बैल जोडी, शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षित असलेल्या मागण्यांचा संदेश देणारी बैल जोडी, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी बैल जोडी, देशाच्या जडणघडणीत काँग्रेसच्या असलेला सहभाग संदेश देणारी बैलजोडी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याच्या व्यथा सांगणारी बैल जोडी अशा संदेशांच्या बैल जोड्यांनी यावेळी हजेरी लावली होती. तर सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैल जोडीला अडीच हजार रुपये प्रोत्साहन पर बक्षीस आणि स्मृतिचिन्ह ही देण्यात आले.
पेरणी ते कापणी ही सर्व कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत समाविष्ट करावीत, महिला शेतकरी नावाचा गट तयार करून महिलेला मशागतीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच एकल महिलांना शेती करण्यासाठी एकही वीस हजार रुपये अनुदान द्यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात येणार आल्या. यावेळी संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांच्या उपस्थितीत झालेल्या या (Bail pola) बैलपोळ्याचे आयोजन तिवसा शहर महिला काँग्रेस समिती, तिवसा काँग्रेस समिती, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी आणि एनएसयुआय यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी आमदार यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur), खासदार बळवंत वानखडे (MP Balwant Wankhade), पुष्पमालाताई ठाकूर, कल्पनाताई दिवे ,हरिभाऊ मोहोड ,दिलीप काळबांडे, कांचनमाला गावंडे, मुकुंद देशमुख, वैभव वानखडे ,सतीश पारधी, योगेश वानखडे,प्रिया विघ्ने, जयंतराव देशमुख, गजानन राठोड,हरीश मोरे, सुरेशराव साबळे,आकांक्षा ठाकूर, मुकद्दर पठाण, सेतू देशमुख, संजय नागोणे, रमेश काळे , मोहनराव वानखडे,रूपाली काळे, शिल्पा हांडे, निलेश खुळे, सेतू देशमुख, अभय देशमुख, अब्दुल सत्तार,विवेक देशमुख, संदीप आमले, शरद वानखडे,मुकुंद पुणसे,ज्योती ठाकरे, दीपक देशमुख, दीपक सावरकर, रवी हांडे, सुरेशराव मेटकर, रवी भाऊ राऊत, किसन मुंदाने, शिल्पा महल्ले, राजू बोडखे, लोकेश केने पंकज देशमुख,रितेश पांडव,सुनील बाखडे,किसन मुंदाने ,अभिजीत बोके, भारत ढोणे, पूनम काळमेघ, वैशाली देशमुख, जयश्री वानखडे, अमर वानखडे, धीरज ठाकरे,शैलेश काळबांडे अनिकेत प्रधान, आकाश मकेश्वर वृंदा काळमेघ, प्रकाशराव माहोरे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.