Risod :- आवर्षण प्रवण क्षेत्रा साठी आणि जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलतारा शोष खड्डे घेण्यासाठी वाशीम जिल्हाभर अभियान सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवणेश्वरी एस मॅडम यांच्या मार्गदर्शनात आज रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर मॅडम यांनी देगाव येथे शेतकरी (Farmer) बैठकीचे आयोजन केले होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीचे सभापती तथा भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर हे होते.
यावेळी मंडळ अधिकारी गरकळ, देगावचे पो. पा. सुरेश पाटील भुतेकर, सरपंच विष्णु कावरखे, सचिव बळीराम भुतेकर, तलाठी कुटे सह जि. पं. शाळा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. जळतारा ही काळाची गरज असून पाणी पातळी उंचावन्या साठी शेतकऱ्यांनीं या मोहिमेत भाग घेण्याचे आव्हान विष्णुपंत भुतेकर यांनी केले. यावेळी उदघाटक म्हणुन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी जलतारासाठी शेतकऱ्यांना प्रशासन पुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून यावेळी जालताराचे भूमिपूजन करून कामाची सुरवात करण्यात आली.