परभणी/जिंतूर(Parbhani):- यलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचे (Accident)प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून त्यांच्या निषेधार्थ दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्या शेजारी शहरातील सर्वच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना जेवण करण्यासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहेत.
जिंतूर येलदरी रस्त्यावरील निमंत्रण पत्रिका
जिंतूर यलदरी मार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय परीसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र मागील काही दिवसांपासून रस्त्यावर जागोजागी मोठं मोठी खड्डे पडली आहेत. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत, परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अनेकांना आपला जीव गमवावा लागला
परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून यलदरी, शेवडी, माणकेश्वर, केहाळ, आंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी यलदरी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्या बदल शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्याजवळ जेवणाचा पंगतीचे आयोजन केले आहे. यावेळी परिसरातही नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.