– मौलाना उमरैन महेफुज रेहमानी
परभणीच्या मानवत शहरात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पैगंबर यांच्या विचारावर प्रवचन कार्यक्रम
परभणी/मानवत (Prophet Mohammad) : देशोन्नती वृत्तसंकलन गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे मी व माझे कुटुंब या पलीकडे जाऊन समाजहित जोपासले पाहिजे, आपल्या देशात अनेक धर्म, जाती-पाती, पंथ आहेत, परंतु मनुष्य धर्म हाच साऱ्यांचा केंद्रबिंदू आहे. अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Mohammad) यांनी सांगितल्याप्रमाणे कुराणामध्ये दिलेल्या निर्देशानुसार मुस्लीम बांधवांनी आपली वागणूक केली पाहिजे असे मौलाना उमरैन महेफुज रेहमानी यांनी बोलताना सांगितले.
मानवत शहरातील मरकस मस्जिद परिसरामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पैगंबर (Prophet Mohammad) यांच्या विचारावर प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुफ्ती मोहम्मद इसाक, हाफेज नोमान, मुफ्ती जुनेद, हाफेज जब्बार खान, मौलाना एजास, मौलाना इलियास, मौलाना अल्ताफ, मौलाना फइम आदींची उपस्थिती होती. प्रत्येकाने चांगला माणूस म्हणून जगले पाहिजे.
आयुष्यात अधिकाधिक काय चांगले करता येईल, त्यातून कितपत पुण्य मिळविता येईल, या दृष्टिकोनातूनच चालले पाहिजे, विशेषतः लग्नकार्यात (निकाह) हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांना फाटा दिला पाहिजे. लग्नकार्यातील डामडौल, अनावश्यक उधळपट्टी वगैरे गोष्टी टाळाव्यात असे आवाहन मौलाना उमरैन महेफुज रेहमानी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केले तर आभार मौलाना मोहम्मद मुजाहिद यांनी मानले कार्यक्रमास शहरातील मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता यशस्वीतेसाठी शहरातील धर्मगुरू व युवकांनी पुढाकार घेतला.