अर्जुनी मोर(Gondia) :- तालुक्यातील गौरनगर येथील राजीव अनंत अधिकारी हा 11 वर्षाचा मुलगा रविवार दिनांक 21 जुलै 2024 ला पुरात वाहून गेला होता. बुधवारी दिनांक 24 जुलै 2024 ला याचा मृतदेह आढळला तहसील कार्यालय (Tehsil Office)अर्जुनी मोरगाव च्या वतीने तातडीने पंचनामा करून प्रकरण तयार केल्याने मंगळवारी दिनांक 30 जुलै 2024 ला तहसीलदार आणि अनिवृध्द कांबळे यांच्या हस्ते मृतांच्या वारसांना चार लाखाचा धनादेश वितरित करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे गावातील नाल्याच्या पुरामध्ये मुलगा वाहून गेला
तालुक्यातील गौरनगर येथील राजीव अनंत अधिकारी हा 11 वर्षाचा मुलगा रविवारी दिनांक 21 जुलै 2024 ला झालेल्या अतिवृष्टीमुळे(heavy rain) गावातील नाल्याच्या पुरामध्ये (Flood) वाहून गेला होता. ही माहिती प्राप्त होतात 22, 23 जुलै पासून तालुकास्तर व जिल्हा स्तरावर शोध व बचाव पथका मार्फत यांचा शोध घेण्यात आला दोन दिवसनंतर शोध लागल्याने अखेर बुधवारी दिनांक 24 जुलै 2024 ला सकाळी मुलांचा मृतदेह घटनास्थळापासून शंभर मीटरवर मिळाला घटनास्थळावरच प्रेताची उत्तरे तपासणी करण्यात आली. प्राप्त रिपोर्टच्या आधारे मृतांच्या वारसांना शासन निर्णय 27 मार्च 2023 च्या निर्देशाप्रमाणे चार लाख रुपये आर्थिक सानुग्रह मदत धनादेशाद्वारे देण्यात आले. तसेच सदर कुटुंबाचा हलाकीची परिस्तिथी असल्यामुळे व त्यांच्या घरी कमवता व्यक्ती कोणीच नसल्याने अन्नधान्याची कमतरता होऊ नये म्हणून अन्नपुरवठा विभागामार्फत अंतोदय कार्ड वित्रीत करण्यात आले. यामुळे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे गौर नगरचे सरपंच विकास वैद्य पोलीस पाटील रत्ना मिस्त्री तलाठी पीएस कागदाचे अव्वल कारकून डी एस परिहार व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते