Parbhani:- मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संघर्षयोध्दा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व राज्य सरकारने (State Govt) या प्रश्नावर चालविलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी परभणी जिल्ह्यात काल पासून जिल्हा बंद ची हाक देण्यात आली होती. मात्र आज ही परभणी जिल्ह्यातील काही तालुके बंद असल्यामुळे परभणी जिल्हा बंदचे आवाहन करताना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तसेच परभणीतील सर्व संस्था, व्यापारी प्रतिष्ठानांनी बंद ठेवून सहकार्य केले. या बंदला सर्व दूर मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान पोलीस यंत्रणेने मोठा बंदोबस्त तैनात केला होता