परभणी (Parbhani) :- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईला ‘थर्टी फर्स्ट’चे वेध लागले आहेत. ३१ डिसेंबरला हॉटेल व धाब्यावर पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. मात्र या जल्लोषावर पोलिस आणि अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
या जल्लोषावर पोलिस आणि अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर
सध्या सोशल मीडियावर (Social media) नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. तरुणाईकडून हॉटेल्स आणि धाब्यावर पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. ३१ डिसेंबरच्या शहर व शहरालगतची हॉटेल्स सजवली जात आहेत. आकर्षक रोषणाई केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनी डीजे, लाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत. विशेष सवलत दिली जात आहे. दोन जणांसाठी दीड हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंतचे प्रवेश शुल्क असणार आहे. ३१ डिसेंबरनिमित्त शहरासह ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले आहे.
३१ डिसेंबरनिमित्त शहरासह ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन
विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) परवानाधारक वाईन शॉप, बीअर बार व परवाना धारक देशी,विदेशी दारु विक्रीच्या वेळात बदल केला आहे. रात्रभर दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे तरुणाईच्या आनंदात कुठेही विरजन पडणार नाही. मात्र या रात्री पोलिस प्रशासन व अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. शिवाय पोलिसांचाही बंदोबस्त असणार आहे. थर्टीफर्स्टची पार्टी करुन अनेक जण अति मद्यप्राशन करुन भरधाव वेगाने वाहने चालवत असतात.
बर्याचदा अपघातही (Accident)होत असतात. त्यामुळे जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. ब्रेथ अॅनालयझर द्वारे मद्यपींची तपासणी होणार आहे. मद्यपींमुळे इतरांच्या देखील जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अति मद्यप्राशन करुन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.




