हिंगोली(Hingoli):- स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजळ यांच्यावर अनेक आरोप करून आ. तान्हाजी मुटकुळे यांना निवेदन दिल्यानंतर आ. मुटकुळेंनी त्याची गंभीरतेने दखल घेतल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी करून सचिवांना पत्र दिले, याप्रकरणानंतर पुरवठा विभागात (Supply Division) एकच खळबळ उडाली असताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या बचावासाठी काही हितचिंतक राशन दुकानदार सरसावले असल्याचे कळते.
दुकानदारांना त्रास देऊन पैसे घेत असल्याचा आरोप जिल्हा रास्तभाव दुकान व किरकोळ केरोसिन विक्रेता संघटनेने केला
हिंगोली येथील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजक हे जिल्ह्यातील दुकानदारांना त्रास देऊन पैसे घेत असल्याचा आरोप जिल्हा रास्तभाव दुकान व किरकोळ केरोसिन विक्रेता संघटनेने केला होता. या प्रकरणात त्यांनी आ. तान्हाजी मुटकुळे यांना निवेदनही दिले होते. त्यावरून आ. तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजळ यांच्या भ्रष्टाचार व वागणुकीबाबत दुकानदारांनी केलेल्या तक्रारीत सत्यता आढळून आल्याने त्यांची ताबडतोब बदली करावी अशी मागणी अब व नागरी पुरवठा विभाग मुंबई (Civil Supplies Department Mumbai) सचिवांकडे पत्राव्दारे केली होती. सदर प्रकरणात संचिवांनी तातडीने अहवाल मागविण्याच्या सुचना १९ डिसेंबरला दिल्या होत्या. जिल्हा पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारामधील वाद विकोपाला गेल्या नंतर आता अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार या संघटनेने देखील ह्या प्रकरणामध्ये उडी मारली, ज्यामध्ये १०० टक्के ट्रांजेक्शनच्या नावाखाली स्वस्त धान्य दुकानदारांची पिळवणुक केली जात असल्याचा आरोप
निवेदनाव्दारे करण्यात आला.
अधिकारी राजेश पुंजल यांच्या वादग्रस्त कारर्किदमुळे पुरवठा विभागात एकच खळबळ
एकुण परिस्थितीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांच्या वादग्रस्त कारर्किदमुळे पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही हितचिंतक रास्तभाव दुकानदारांना हाताशी धरून हे बंड शमविण्याचा प्रयत्न जोरदार सुरू झाला. त्याच निमित्ताने काही हितचिंतक असलेल्या रास्तभाव दुकानदारांने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची पाठराखन करण्याकरीता एक बैठकही घेतली असल्याचे खात्री लायक वृत्त आहे. संघटनेमध्ये फुट पाडून हे बंड शमविण्याकरीता काही हितचिंतक स्वस्त धान्य दुकानदारांनी पुढाकार घेतला. ज्यामध्ये एका स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव हिंगोली तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केला असल्याचे सुत्राकडून कळते. परंतु या प्रस्तावावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नसल्याने आपल्या दुकानावरील निलंबनाचा ससेमिरा टाळण्याकरीता हितचिंतक स्वस्तधान्य दुकानदार सरसावले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई होते की, त्यांना अभय मिळते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.