नवी दिल्ली/ मुंबई (Today Weather Report) : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज केरळ, कर्नाटक आणि गोव्यात अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय ओडिशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या 3 दिवसांत या भागाला नैऋत्य मान्सूनपासून मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. दिल्लीत हलक्या पावसाने (heavy rain) दिलासा मिळाला आहे. 25 जूनपर्यंत नैऋत्य मान्सून गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हवामान स्थिती अनुकूल असल्याचे वर्तविण्यात आले आहे.
आजचे हवामान कसे असणार?
आज तापमान 38.59 अंश सेल्सिअस आहे. आज किमान तापमान 30.05 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 43.54 अंश सेल्सिअस आहे. आर्द्रता 32% आणि वाऱ्याचा वेग 32 किमी/तास आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात येणार मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?
भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की, उत्तर प्रदेशात 2-3 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडणार आहे. मान्सूनपूर्व स्थिती आधीच सक्रिय झाली आहे आणि आज अनेक राज्यात (heavy rain) पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून पूर्व उत्तर भागात पारा खाली जाण्याची शक्यता आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसांत (heavy rain) पाऊस उत्तर प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. 23-24 जून रोजी राजधानी आणि आसपास चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये मान्सूनची स्थिती?
येत्या 4 दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, 23 आणि 24 जून रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणि 22 जून रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये (heavy rain) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 21-25 जून दरम्यान, ओडिशामध्ये 22 जून, झारखंडमध्ये 24 आणि 25 जून आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 22-25 जून दरम्यान (heavy rain) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 ते 25 जून दरम्यान कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 आणि 23 जूनला गुजरातमध्ये, 23 जूनला मराठवाड्यात आणि 24 आणि 25 जूनला दक्षिण-पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडेल. केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये 25 जूनपर्यंत आणि तेलंगणामध्ये 22 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.