नवी दिल्ली/ मुंबई (Today Weather Report) : संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असून, सर्व पावसाचा आनंद लुटत आहेत. IMDनुसार, देशभरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. (Weather Forecast) हवामान विभागानेआज दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. आज उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडणार असून, त्यामुळेच हवामान विभागाने येथे अलर्ट जारी केला आहे. राजधानीत (Heavy rain) मुसळधार पावसानंतर शनिवारीही अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. अशा परिस्थितीत आज रविवारीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज हवामान विभागाने दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने चार ते पाच दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजधानीत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
राजधानीतील पावसाचा 88 वर्ष जुना विक्रम मोडला गेला आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण दिल्ली भिजली होती. त्यानंतर शनिवारीही (Heavy rain) मुसळधार पावसाची नोंद झाली. अशा परिस्थितीत, IMD च्या माहितीनुसार, आजही दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. जवळपास संपूर्ण देशभरात व्यापलेल्या मान्सूनबाबत (Weather Forecast) हवामान विभागाने राजधानीसह अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दिल्लीशिवाय हिमाचल, राजस्थान, हरियाणा, यूपी, बिहार, झारखंड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. शेतकरी सुखावले; तब्बल 2 तास मुसळधार पाऊस
#WATCH गुजरात: महेसाणा शहर के कई हिस्सों में बारिश हुई। वीडियो अहमदाबाद-मेहसाणा हाईवे से है। pic.twitter.com/dQSS00mvG6
— ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2024
राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी
आजपासून येत्या तीन दिवसांत राजधानीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा अंदाज पाहता (Weather Forecast) हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचून अनेक अपघात झाल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस उत्तर-पश्चिम भारत आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये (Heavy rain) मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम राजस्थान, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मूमध्ये दोन ते तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये 30 जून ते 2 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.