नवी दिल्ली/ मुंबई (Today Weather Report) : देशातील अनेक राज्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट (Heat to Rain) सुरूच आहे. विशेषत: उत्तरेकडील राज्यांना यावेळी दमट उष्णतेचा फटका बसत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे (Rain weather) कमाल तापमानात घट झाली आहे. दुसरीकडे, राजस्थान, यूपी आणि हरियाणामध्ये मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान, उत्तर भारतातील 4 राज्यांमध्ये उन्हाळ्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा (Weather Forecast) हवामान विभागाने जारी केला आहे. राज्यात मुसळधार ते अति मुसळधार, रेड अलर्ट
पावसामुळे उष्णतेपासून मिळणार दिलासा
राजधानीत आणि परिसरात थोड्या पावसाला सुरुवात झाली आहे. कमाल तापमान 40.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत असला तरी आनंदाची बातमी असून, दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy weather) राहील आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून 30 जूनपर्यंत दिल्लीत दाखल होणार असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन! येत्या 5 दिवसांत राज्यात येणार मुसळधार पाऊस
काही ठिकाणी पावसाचा इशारा तर इतर ठिकाणी उष्णतेचा इशारा
राजस्थानमध्ये हवामानात (Weather Forecast) मोठा बदल पाहायला मिळत आहेत. एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व सक्रियता असून, मुसळधार पावसाचा कालावधी सुरूच आहे. दुसरीकडे, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने (Weather Forecast) दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर, जैसलमेर, हनुमानगड, चुरू आणि बिकानेरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे अतिवृष्टीचा इशारा (Heavy rainfall) देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, मान्सूनने गुजरात आणि मध्य प्रदेशातील बहुतांश जिल्हे व्यापले आहेत. येत्या 2 दिवसांत राजस्थानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
45 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
त्तर प्रदेशातील लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने (Heat to Rain) उष्णतेपासून दिलासा मिळाला. दिवसभर कडक उन्हामुळे उकाडा जाणवत होता. पण, सायंकाळपर्यंत वातावरण बदलले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. याबाबत (Weather Forecast) हवामान विभागाकडून 45 जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या (Cloudy weather) वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानुसार, 26 आणि 27 जून रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात ढगाळ वातावरण आणि चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
बिहारसाठी हवामानाचा इशारा
बिहारमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मात्र, अजूनही अनेक राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असे (Weather Forecast) हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, 28 जूनपर्यंत अतिवृष्टीबाबत 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. पाटणा बक्सर, भोजपूर, आराह, कैमूर, रोहतास, औरंगाबाद, गया, जहानाबाद आणि नालंदा येथे उष्णतेच्या लाटेबाबत इशारा देण्यात आला आहे.