72 तासांचा इशारा, हवामानाबाबत मोठे अपडेट
नवी दिल्ली/मुंबई (Today Weather Report) : गेल्या आठवड्यापासून हवामानात (Weather Department) मोठे बदल दिसून येत आहे. राजधानीत दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. IMD नुसार, राजधानीत सर्वाधिक 228 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आठवड्यात दिल्लीत आणखी मुसळधार आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातील इतर भागांत मान्सूनचे आगमन पुढील 72 तासांत होणार आहेत. आज पहाटे राजधानीत जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत ते उत्तर-पश्चिम भारताच्या उर्वरित भागांमध्ये (Rain weather) मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजधानीत 3 तास मुसळधार पाऊस
पहाटे 2:30 ते पहाटे 5:30 दरम्यान सर्वाधिक 228 मिमी पावसाची नोंद केली आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून जावे लागले आणि मुलांना घेऊन पूरग्रस्त (Heavy rain and hail) रस्त्यावरून चालावे लागले. काही भागात मेट्रो स्थानकांमध्येही पाणी साचले, त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या होत्या. येत्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल; अनेक भागात पावसाची हजेरी
येत्या तीन दिवसांत उत्तर भारतात मान्सून
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील 2-3 दिवस उत्तर भारतात मुसळधार ते (Heavy rainfall) अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी 29 जून रोजी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) हवामान विभागाने वर्तवली आहे.