‘या’ राज्यांमध्ये जोरदार, हवामान खात्याचा इशारा
नवी दिल्ली/मुंबई (Today Weather Updates) : देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy rainfall) सुरु आहे. काही ठिकाणी पाऊस अडचणीचा ठरत असून, काही ठिकाणी कमी पावसामुळे लोक चिंतेत आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेशसह अनेक राज्ये सध्या आकाशी आपत्तीचा सामना करत आहेत. (Maharashtra Weather) महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे मुंबईसह अनेक शहरे जलमय झाली आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गही पाण्यात बुडाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुसळधार ते अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rainfall) आणि वादळाची शक्यता आहे.
येथे CLICK करा: राज्यात मुसळधार, 4 दिवस रेड अलर्ट
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (Heavy rainfall) मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Weather) हवामान विभागानेने रेड अलर्ट जारी केला आहे. IMDने मुंबई आणि पालघरमध्ये यलो अलर्ट तर ठाणे, रायगड आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सतत पाऊस आणि वादळामुळे मुंबईच्या उपनगरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त आहे.
केरळमध्ये पावसाचा रेड अलर्ट
IMD ने केरळमधील मलप्पुरम, कन्नूर आणि कासारगोडसाठी रेड अलर्ट आणि एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, कोझिकोड आणि वायनाडसाठी (Orange alert) ऑरेंज अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये (Today Weather Report) येत्या काही दिवसांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दिल्लीतही मुसळधार पाऊस
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीमध्ये हलका पाऊस आणि मध्यम वारे वाहण्याची शक्यता आहे. देशातील (Today Weather Report) सध्याच्या मान्सूनच्या स्थितीनुसार, आज आणि उद्या गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी कर्नाटकात अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच (Heavy rainfall) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.