माहूर (Nanded):- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यापेक्षा विक्रमी पावसाची नोंद हि किनवट माहुर तालुक्यात होत असते परंतु चालू पावसाळ्यात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवल्याने नदी नाले कोरडीच होती पण दि.१ च्या मध्यरात्री पासून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने(Heavy rain) तालुक्यास झोडपून काढल्याने नाल्याचे व वळणाचे पाणी शेतशिवारात शिरल्याने सोयाबीन कापूस तुर अशा खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले.
खरीप हंगामाचे मोठे नुकसान
अधिच खते बि बियाण्याच्या महागाईतुन होरपळून पेरणी केली खरीप हंगामावर वरुन राजाने कृपादृष्टी दाखवित माफक प्रमाणात पाणी पडल्याने खरीपाचा हंगाम बहरला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस चांगले येतील. अशी आशा बाळगुन हसु फुलले होते पिके ऐन फुल पातीवर असतानाच दि १ रोजी च्या मध्यरात्री पासून तालुक्यात वार्याच्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने काहीतासातच आजवर कोरडी ठाक असलेल्या नाल्यांना पुर असल्याने या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकास शिरल्याने शेकडो हेक्टरावरील उभी पिके आडवी झाल्याने सुगीच्या दिवसाचे स्वप्न पाहाणार्या शेतकऱ्यांच्या स्वपनावर विरजन पडले असुन खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाच्या वतीने पिक नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
नागरीकांच्या जीवनावश्यक वस्तुची नासाडी झाली
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथील काही भागातील नागरीकांच्या घरासह दुकानात पुराचे पाणी शिरल्याने दुकातील मालाची व नागरीकांच्या जिवन आवश्यक वस्तुची नासाडी झाली. तर ग्रामिण भागातील छोट्या मोठ्या नाल्याच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहिले. विदर्भ मराठवाडा (Marathwada)जोडणार्या धनोडा येथिल पैनगंगा नदी पात्रावरील पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला नदीवर नुतन पुल उभारण्यात आला पण पुलाच्या दोन्ही बाजुने राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडल्याने पुल रहदारी साठी खुला करण्यात आला नाही तर जुना पुल हा निजाम कालीन असल्याने पुल या पहीले देखिल उखडून गेल्याने कमपुवत झाला एखादी मोठी दुर्घटना घडुन जिवित हाणी होण्याअगोदरच या कडे नांदेड व यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.