Parbhani :- परभणीतील गंगाखेड तालुक्यातील तीस वर्षीय मतिमंद महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना सहा महिन्यापूर्वी गंगाखेड शहरात घडली असुन याप्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात (Police station)एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड शहरातील घटना एकाविरुद्ध गुन्हा दखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील मतिमंद महिला डोक्यावर परिणाम झालेला असल्याने सुमारे पाच ते सहा वर्षांपासून पतीच्या घरी राहत नाही. गंगाखेड शहरातील रस्त्यावर फिरत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या तीस वर्षीय मतिमंद महिलेच्या डोक्यावर असलेल्या परिणाचा गैर फायदा घेत शहरातील संतोष वाघमारे नामक इसमाने सुमारे सहा महिन्यापूर्वी रात्री १ वाजेच्या सुमारास कोद्री रस्त्यावरील एका दुकानाच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला व यातून ही मतिमंद महिला गरोदर असल्याची बाब गेल्या आठवड्यात उघडकीस आली. ही मतिमंद महिला पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीस बोलावून चौकशी केली तेंव्हा त्याने घडल्या प्रकाराबाबत तिच्याकडे विचारणा केली असता तिने वरीलप्रमाणे घडलेला प्रकार सांगितला.
याप्रकरणी मतिमंद महिलेच्या (Mental retarded woman) पतीने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी रात्री उशिराने संतोष वाघमारे नामक इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपाली गित्ते, पो.शि. संग्राम शिंदे हे करीत आहेत.




