चालक जखमी, अद्याप पर्यंत कोणत्याही गुन्हा दाखल नाही
कळमनुरी (Tractor Accident) : वाळू भरलेल्या ट्रॅक्टर पुला वरून खाली कोसळला यामध्ये चालक जखमी झाला असून सदर घडने बाबत अद्याप पर्यंत कोणत्याही गुन्हा दाखल नाही.ट्रॅक्टर पुलावरून कोसळले असताना काही जणांची तेरी बी चुप मेरी भी चुप अशी अवस्था झाली होती.
कळमनुरी तालुक्यातील सालेगाव कडून वाळू भरून येत असलेले ट्रॅक्टर नदीचे पुलाचे कठडे तोडून १९ जून रोजी खाली पडला. यामध्ये चालक जखमी झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी सांगितले सदर ट्रॅक्टर (Tractor Accident) मागे प्रशासनाचे चाहन असल्याने चालकाने भरधाव वेगात ट्रॅक्टर पळविल्याने ही घटना घडल्याची चर्चा आहे .परंतु उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला ना होता घटना घडतात मोठ्या प्रमाणात लोकांनी चालकाला बाहेर काढून ट्रॅक्टर सरळ केले व ट्रॅक्टर तात्काळ घटनास्थळावरून घेऊन गेले असल्याची माहिती काही लोकांनी दिली आहे.
या घटनेमुळे तेरी भी चूप मेरी भी चुप अशी चर्चा होत आहे.एकीकडे अवैध वाहतुक विरुध्द महसुल व पोलीस प्रशासनाने जोरदार मोहिम राबविलेली असताना दुसरीकडे मात्र हे (Tractor Accident) ट्रॅक्टर पुलाच्या खाली कोसळुन सुध्दा या संदर्भात माहिती मिळेपर्यंत कोणतेही कारवाई झाली नसल्याने याबाबत उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.




