गोवारी टोला ते देवनारा मार्गावरील घटना
गर्रा/बघेडा (Tractor-Bike Accident) : भरधाव जात असलेल्या ट्रॅक्टर ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात (Tractor-Bike Accident) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोवारी टोला ते देवनारा मार्गावर दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान घडली. रवींद्र सुरेश कुंमरे(२२) रा. गुडरी असे मृतकाचे नाव असून आकाश भगवंत धुर्वे(२२) रा. गुडरी असे गंभीर जखमीचे नाव आहे, तर गोपीचंद बकाराम पंदाम(४१) रा. देवनारा असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
यातील रवींद्र कुमरे व आकाश धुर्वे हे दोघेही दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएच २६९१ ने गोवारी टोला ते देवनारा मार्गावरून जात होते. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एएल ९६३१ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक्टर हयगयीने व निष्काळजीपणाने चालविल्याने (Tractor-Bike Accident) ट्रॅक्टरच्या मागील भागाची दुचाकीला धडक लागल्याने दुचाकी स्लिप झाली. यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले. तेथे जखमींवर उपचार सुरू असतांना रवींद्र कुमरे याचा मृत्यू झाला असून आकाश धुर्वे याची स्थिती नाजूक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द गोबरवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Tractor-Bike Accident) घटनेचा पुढील तपास पोहवा मंगेश पेंदाम करीत आहेत.