कोरेगाव (Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील चोप ते कोरेगाव हा जिल्हा मार्ग असून हा रस्ता गडचिरोली व गोंदिया (Gondia)जिल्ह्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यापासून वायडिंगचे काम (Widing work)संतगतीत सुरू आहे. त्यामुळे आज पर्यंत छोटे-मोठे अपघात घडत होते ,परंतु आज सकाळच्या दहाच्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्याच्या नादात रखडलेल्या रस्त्यावर गिट्टि ढिगारावर ट्रॅक्टर गेल्याने चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटून चालक ट्रॅक्टर (Tractor)खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्टेरिंग वरून नियंत्रण सुटून चालक ट्रॅक्टर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश शनिराम ठाकरे वय वर्षे 32 आहे. शंकरपुर ते बोडधा हा गडचिरोली गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा जिल्हा मार्ग आहे. हा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी गेल्या काही वर्षापासून सुरू होती. दोन वर्षापूर्वी शंकरपूर ते चोप पर्यंत वाइंडिंग करून रस्ता रुंदीकरण करण्यात आला परंतु चोप ते बोळधा रस्ता रखडला होता. पुन्हा मागणीनुसार चोप ते कोरेगाव यात दीड किलोमीटर अंतराचे रस्ता काम जानेवारी महिन्यात काम सुरू झाले. परंतु कंत्राट दादाच्या ढिसळ कारभारामुळे रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे त्या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात (Accident)होत घडत होते 25 मार्चला देशोन्नती (Deshonnati)ला ही बातमी प्रकाशित झालेली होती, तेव्हा कामाला वेग आला आणि घाई गडबडीत कामाला सुरुवात झाली. शासकीय आदेश निघाल्याने रखडलेल्या रस्त्यांमुळे जिल्ह्यापासून गावे तुटली तेव्हापासून कंत्राट दारानी अत्यंत घाई गडबडीत कामाला सुरुवात केली. खोदलेल्या रस्त्यावर गिट्टीचे ढिगार टाकले परंतु रस्ता बांधकाम चालू आहे असा कुठलाही फलक लावला नाही वा चेतावणीसाठी रस्त्यावर कुठलेही मार्गदर्शन चिन्ह लावलेल्या नाहीत.
पायातील चप्पल तुटल्याने ट्रॅक्टर खाली पडला
कोरेगाव ते चोप या रस्त्यावर तीन ठिकाणी पाईप टाकून बांधकाम करण्यात आलय ते थातूरमातूर बुजवण्यासाठी मुरमाच्या जागी माती टाकण्यात आली त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांच्या गाडीचे संतुलन बिघडून जखमी झाले. 14 जून पासून चोप गावातीलच तलावातील गाळउपसा करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. आज दिनांक 29 तारखेचा सकाळच्या सुमारास अविनाश हा नागपूरकर च्या ट्रॅक्टर घेऊन गाळ घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने रस्ता न दिल्याने बाजूला खोदलेल्या रस्त्याच्यावर टाकलेल्या गीट्टीच्या ढिगाऱ्यारावर ट्रॅक्टर गेल्याने चालक अविनाश चे ट्रॅक्टर वरून नियंत्रण सुटले ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर गेल्याने अविनाशने ब्रेक दाबला. परंतु पायातील चप्पल तुटल्याने ट्रॅक्टर खाली पडला अविनाश त्या ट्रॅक्टर खाली आल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अविनाशचा जागीच मृत्यू झाला. त्याची माहिती चोपा कोरेगाव परिसरात पसरताच कंत्राट दाराबाबत रोषनिर्माण झाला आणि रस्त्याचे दीड किलोमीटरचे काम सहा महिने लागल्याने व मरूमाच्या खाली माती युक्त मुरुम टाकल्याने व रस्ता चिकलमे झाल्याने अनेक रस्त्यावर छोटे-मोठे अपघात घडत होते.
पंचनामा करून मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी देसाईगंज रुग्णालयात
कुठल्याही प्रकारची चेतावणी फलक नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे याची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळतात उपनिरीक्षक कोमल माने, बीड जमादार सर्फे यांनी मोका पंचनामा करून मृतदेह (dead body)उत्तरनिय तपासणीसाठी देसाईगंज रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप, एपीआय आगरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली कोमल माने व सरफे हे करीत आहेत. तर या अपघाताला कारणीभूत असलेल्या असलेल्या नवर कठोर कारवाई करण्याचे व सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. अविनाश च्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.