भिवापूर(Nagpur):- तालुक्यातील चिचाळा गावात ट्रॅक्टर (Tractor)शेतकऱ्याच्या मित्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ट्रॅक्टरचा पोळा भरून अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला. स्थानिक शिव मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर सजवून रॅली काढण्यात आली.
शिव मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर सजवून रॅली काढण्यात आली
या रॅलीमध्ये उमर क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांची लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ट्रॅक्टर चालक मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे राजु पारवे, माजी आमदार प्रकाश गजभिये दर्शनी धवड, मुकेश गायगावडी, चेतन पडोळे ,मारुती गिरडे चेतन पडोळे नागोराव डहारे, नरेश गिरडे विनायक पडोळे अरविंद पडोळे संजय लेदाडे मोतीराम पडोळे केशवले लेदाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अर्जुन गिरडे प्रास्ताविक सुधाकर पडोळे तर आभार अरुण वर्गणी यांनी मांनले.