१ लाख ३० हजारांचा दंड लागणार
हिंगोली (illegal sand) : जिल्ह्यात अवैध रेती उपसा करणारे वाळू माफिये मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून रात्री-बेरात्री अवैध रित्या रेती उपसा करून बांधकाम धारकांना रेतीची विक्री अव्वा ते सव्वा दराने केली जात आहे. यावर आळा बसण्याकरीता हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्या आदेशाने व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पथकाची नेमणुक केली आहे.
आज ९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जवळा पळशी रस्त्यावर (illegal sand) अवैध रित्या वाहतुक करणार्या ट्रॅक्टर चालकाला पकडुन अवैध रेती करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आहे. या अवैध रेती वाहतुक करणार्या चालकाला व मालकाला १ लाख ३० हजार ते १ लाख ५० हजारापर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता असल्याचे महसुल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी हिंगोली समाधान घुटुकडे यांच्या आदेशान्वये व तहसीलदार श्रीकांत भुजबळ हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी जवळा पळशी रोडवर एक अवैध रेती वाहतूक करत असताना हिंगोली येथील महसुल विभागाचे पथक प्रमुख, मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल यांच्या पथकाने अवैध रेती वाहतुक करणारे १ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय येथे जप्त करण्यात आले. या कारवाईत मंडळ अधिकारी सय्यद आयुब सय्यद रसुल, मुसने,शेळके, वानोळे, निर्मल, तलाठी धनवे यांनी हि कारवाई केली तर ट्रॅक्टर चालक चव्हाण असल्याचे सांगितले असून ट्रॅक्टर मालक काळे हा आहे.