परभणी(Parbhani):- राज्य शासनाची(State Govt) महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हाभरात राबविण्यात येत असून या योजनेद्वारे खासगी व निमशासकीय अस्थापनांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
योजनेंतर्गत प्रशिक्षण व विद्यावेतन मिळणार नोंदणी करण्याचे कौशल्य विभागाचे आवाहन
योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका प्रशिक्षणार्थ्यांना ८ हजार आणि पदवीधर (graduate) व पदव्युतर प्रशिक्षणार्थ्यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व्यक्ती प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकते. शिक्षण सुरु असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. उमेदवारांनी रोजगार उद्द्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असून या दरम्यान उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना व उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतात. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ आदींमध्ये मंजूर पदांच्या ५ टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी योजनेंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करा
जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय(Collector’s Office), तहसील कार्यालय(Tehsil Office), महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, एस. टी महामंडळ, विद्युत वितरण कंपनी, शासकीय खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(Government Medical College), खाजगी महाविद्यालये, राष्ट्रीयकृत सहकारी खाजगी बँका आदी कार्यालयांमध्ये क्लर्क, ऑफिस सहायक, ऑपरेटर, शिपाई, परिचर, सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक, वार्ड बॉय, तलाठी, सहायक, सिक्युरिटी गार्ड, स्वयंपाकी, वार्डन, माळी, बागकाम आदी पदे इंटर्नशिपसाठी भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी योजनेंतर्गत ऑनलाईन (Online) व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा.
गावागावात नेमणार योजनातादूत
शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत-जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी योजनादूत नेमण्याची योजना सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय(budget) राबविली जाणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ याप्रमाणे एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी अथवा ऑफलाईन नोंदणी अर्ज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, परभणी या कार्यालयास सादर करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिपसाठीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्यो्जकता, परभणी यांनी केले आहे.