कन्हान (Worker Welfare Center) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत कामगार कल्याण केंद्र (Worker Welfare Center) कन्हान येथे सो प्रतिभा भाकरे मॅडम सहाय्यक कल्याण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 /08 2025 ते 29/ 08/ 2025 पर्यंत मेहंदी प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम घेण्यात आले. त्या कार्यक्रमाचे समापन कार्यक्रम आज घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सीमा कोचे सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे कविता इंगुलकर तसेच प्रशिक्षिका आरती चकोले कार्यक्रमाला उपस्थित झाले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अध्यक्षीय भाषणात कोचें मॅडम यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. (Worker Welfare Center) कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे विविध प्रशिक्षणाचे आयोजन नेहमीच होत असते तसेच शिवणकाम प्रशिक्षण,संस्कार रांगोळी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण,असे महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे सतत सुरु असतात या द्व्यारे महिलांना व्यावसायिक कौशल्ये शिकवून त्यांना स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी मदत होते असे अनेक व्यावसायिक प्रशिक्षण कामगार कल्याण क्रँद्रात उपलब्ध असतात, ज्यामुळे महिला आत्मनिर्भर बनतात.
महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात त्यांचे स्थान अधिक मजबूत करण्यास मदत होते . सध्याचा काळ हा विविध प्रकारची कौशल्य हस्तगत करण्याचा आणि त्याचे सतत उन्नतीकरण करण्याचा व नवी नवी कौशल्ये शिकून घेण्याचा आहे. (Worker Welfare Center) कौशल्य प्राप्त करुन त्यात पारंगतता मिळवली तर कोणत्याही व्यक्तीस रोजगारापासून वंचित राहावे लागणार नाही असे मत सीमा कोचे यांनी व्यत केले. कविता इंगुलकर यांनी मार्गदशनात म्हणाल्या कि अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींमध्ये डिझाईन काढण्याचे कला उत्पन्न होते.
प्रशिक्षणे आपले मनोगत प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयम रोजगार कसा उपलब्ध होतो हे मुलींना पटवून दिले. पाहुण्यांच्या हस्ते मुलींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवनीकर मॅडम यांनी केले. (Worker Welfare Center) कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिव्या ,भरणे ,शितल, सरोज, यांनी सहकार्य केले कार्यक्रमात वीस महिला व मुलींनी भाग घेतलेला होता सुदेशना ,आचल ,जानवी, स्वीटी, वैशाली ,बरखा ,सेजल, किरण, दीक्षा,प्रणाली ,वंशिका प्राची, कोमल, श्वेता ,प्रज्ञा, निकिता, कार्यक्रमाला उपस्थित होते.