मानोरा (Revenue Week) : शासनाच्या महसूल व वन विभाग अंतर्गत सध्या मानोऱ्या तालुक्यात (Revenue Week) महसूल सप्ताह अंतर्गत विविध लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केले जात आहे. मानोरा मानोरा तहसीलचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शना नुसार मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासी नायब तहसीलदार संदीप आडे यांच्याद्वारे दि ३ आगस्टला शासकीय योजनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. सर्व प्रथम मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
औद्योगिक संस्थेत आयोजित या कार्यक्रमाला नायब तहसीलदार आडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शहर आणि तालुका औद्योगिक दृष्टया माघारलेला असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य असल्याचे सांगितले. प्रशिक्षण संस्थेतील विविध तांत्रिक शाखातून शिक्षण घेतल्यानंतर राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे. (Revenue Week) या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे राज्यातील उद्योजक जोडले जाणार असल्याने रोजगार इच्छुक तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या युवक युवतींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव शासनाच्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारा प्रशिक्षण मिळून त्यांची क्षमता वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्यातील उद्योजकांना त्यांच्या उद्योगांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळणार आहे. (Revenue Week) रोजगार इच्छुक तालुक्यातील उमेदवार आणि प्रशिक्षण देवू इच्छिणारे उद्योजक यांना शासनाच्या उपरोक्त विभागाद्वारे विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळावर सुलभरीत्या नोंदणी करता येणार असल्याने उद्योजक व रोजगार इच्छुक यांच्यासाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाभकारी असणार असल्याचे प्रतिपादन निवासी नायब तहसीलदार संदीप आडे यांनी विशेष उपक्रम अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य आर पी काळे, पी पी जामकर, डी ए रोठे, एस के ठाकूर, एन के तायडे, एम व्ही मुराळे, पी एन सोमाणी यांच्या सह विद्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते.