जेव्हा मतदारच करतात नेत्याच्या कामाची प्रशंसा
हिंगणा (MLA Sameer Meghe) : मागील दहा वर्षात कधी नव्हे इतकी विकासकामे हिंगणा मतदार संघात झाली आहेत. नागरी सुविधांमध्ये सातत्याने भरच पडत आहे. आमदार समीर मेघे यांनी आणलेल्या शासकीय निधीतून मोठ्या प्रमाणात बदल घडून आले असून त्यांनी या भागाचा चेहरामोहराच बदलला, ही बाब आता मतदारच बोलायला लागल्याचे चित्र आज हिंगणा विधानसभा मतदारसंघातील (Hingana Assembly Constituency) जनसंवाद दौऱ्यात दिसून आले.

भाजप महायुतीचे उमेदवार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांनी जनसंवाद दौऱ्यादरम्यान फेटरी, गोधनी, बोखारा या सर्कलमधील नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या सर्कलमधील येरला, बोरगाव, खंडाळा, भरतवाडा, ब्राम्हणवाडा, बैलवाडा, गुमथळा, लोणारा, चक्कीखापा, दवलामेटी आदी गावांमध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधला. सरकारी योजनांव्यतिरिक्तही आपल्याकडून वैयक्तिक स्तरावर अजून काय अपेक्षा आहेत, याची विचारपूसही समीर मेघे यांनी यावेळी केली. गावातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी, सार्वजनिक समस्या, आगामी योजना तसेच विकासाच्या मुद्यांबाबत आ. मेघे यांनी लोकांशी मनमोकळी चर्चा केली. सरकारी योजनांची माहिती देताना भाजप महायुती सरकार नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत आले आहे आणि हे धोरण भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाही मेघे (MLA Sameer Meghe) यांनी यावेळी दिली.
केवळ शासकीय नव्हे तर वैयक्तिक स्तरावरही उच्च शिक्षणाची सुविधा, दर्जेदार वैद्यकीय सेवा, सहकारी सूतगिरणी, कोऑपरेटीव्ह बँक, शाळा व अन्य औद्योगिक सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम मेघे परिवाराने केल्याची भावना या दौऱ्यात भेटलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविली.

या संवाद यात्रेत भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मंगलसिंह बैस, विश्वनाथ लांडगे, अंकित ठाकरे, प्रमोद गामे, भोजराज घोडमारे, गुणवंत घोडमारे, भूषण बोरकुटे, तन्मय नरेंद्र खोरगडे, विलास श्रीखंडे, सुरेश लांडगे, सुरेश बेलकर, प्रेम ढोणे, पांडुरंग वाघ, सुधाकर ठाकरे, प्रफुल ढोले, गणेश खोरगडे, सुरेश गोमासे, वसंत सोनसरे, मोरेश्वर सोनसरे, गौरव ठाकरे, अविनाश तरवटकर, शोभा रघुसे, पुरुषोततम रघुसे, निलेश कोठाळे, ईश्वर मोरे, हेमराज मोरे, मुकेश भोयर, कांता मांगे, चंद्रशेखर मांगे, ऋषी दाखोडे, मनोज उचके, सचिन निस्ताने, शशिकांत खोडे, भाऊराव गोमासे, अर्जुनसिंह राठोड, रत्नाकर ठाकरे, शिवराज ठाकरे, राजेश ढेपे, निलेश डहाके, प्रमोद भोयर, विजय राऊत, शुद्धोधन कोलते, दिनेश डिवरे, शरद निंभोरकर, तुषार तांदूळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांचा जनसंवाद दौरा केवळ एक प्रचार दौरा न राहता हिंगणा मतदारसंघातील (Hingana Constituency) नागरिकांना सरकारच्या योजनांची माहिती देण्यासोबतच आपल्या लोकांच्या समस्या समजून घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी असलेली तळमळ त्यातून दिसून आली.




