मंगरूळपीर(Washim):- कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील शाहबाज खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रवीण ठाकरे यांनी तक्रार दिली की, शाहबास खान महबूब खान नामक इसम हा एका वाहनातून कत्तलीसाठी जनावरे नेत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार नाकाबंदी (Blockade)करून केलेल्या कारवाईत मंगळसा फाटा येथे एम एच ३७ टी १३०७ या क्रमांकाच्या वाहनातून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीचे ५ गोर्हे कत्तलीसाठी(slaughter) नेले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार वाहन व चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे .