भिवापूर तालुक्यातील तास गावाजवळील घटना
भिवापूर (Travel-Truck accident) : ट्रॅव्हल्स व ट्रकच्या भीषण अपघातात चार जण मृत्युमुखी पडले असून तब्बल 22 नागरिक जखमी झाल्याची( Travel-Truck accident) घटना आज दुपारी साडेबारा वाजता च्या सुमारास भिवापूर तालुक्यातील तास गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मा दुर्गा ट्रॅव्हल्स एम एच- 49-16-8616 ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून मुल ला जात होती. एम एच 31 एपी2966 क्रमांकाचा ट्रक हा भिवापूर वरून तास गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानातील धान्य पोहोचवण्यासाठी जात होता. ट्रॅव्हल्स ही तास गावाजवळ आल्यानंतर ट्रकला ट्रॅव्हल्स ने धडक दिली. या (Travel-Truck accident) भीषण अपघातात घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा ही समावेश असल्याची माहिती आहे. जखमी मधील अन्य काही जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.