जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण!
हिंगोली (Tree Plantation) : स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून व मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली “5 स्टार हिंगोलीकर” (5 Star Hingolikar) हा अभिनव उपक्रम हिंगोली शहरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, हिंगोली नगर परिषद (Hingoli Municipal Council) कार्यक्षेत्रातील सर्व घरे, व्यावसायिक व शैक्षणिक आस्थापना, तसेच शासकीय कार्यालये (Government Offices) यांनी जलपुनर्भरण, घराभोवती किमान 5 झाडे लावणे, कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण, रुफटॉप सोलर पॅनल, हिंगोली नगर परिषद मार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा नियमित व वेळेत भरणा अश्या पाच निकषांची पूर्तता करून 5 स्टार रेटिंगचा बहुमान प्राप्त करावयाचा आहे, वरील निकषांनुसार प्रत्येक घर व आस्थापनांचे सर्वेक्षण करून मूल्यांकन नगर परिषदेने (City Council) नेमलेल्या समिती तर्फे करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांच्या हस्ते कमला नगर येथे समाज मंदिर परिसरात व नागरिकांच्या घरी 5 झाडे घरोघरी लाऊन वृक्षारोपण (Tree Plantation) समारोह पार पाडण्यात आला.
मान्यवरांचे शाल व हार घालून स्वागत!
कार्यक्रमा प्रसंगी सर्वप्रथम माजी नगर अध्यक्ष अनिता ताई सूर्यतळ यांनी मान्यवरांचा शाल व हार घालून स्वागत केले तसेच कमला नगर येथील महिलांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ यांनी प्रस्तावित केले तसेच मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. मा. जिल्हाधिकारी महोदयांनी या उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. ज्यात सोलर पॅनल लाऊन विजेजी निर्मिती व वीज बिलात मिळणारी सवलत नागरिकांनी घ्यावी. पर्यावरणाचा (Environment) समतोल राखण्यासाठी झाडे जास्तीत जास्त लावावीत ज्याचे घरासमोर किंवा घरात झाडे लावण्यासाठी जागा नाही अश्या नागरिकांनी ओपन स्पेस मध्ये झाडे लावावीत. तसेच जल पुनर्भरण करून जमिनीतल पाण्याचा साठा वाढवावा व कचऱ्याचे घरातच विलगीकरण करून नगर परिषदेस देण्यात यावा आणि नगर परिषदेचे कर नियमितपने भरणा करून लागणारी शास्तीतून सुट मिळवावी अशी 5 स्टार हिंगोलीकर निकषांची सविस्तर माहिती मा. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभियाना अंतर्गत दिली. या करिता हिंगोली नगर परिषदे तर्फे हिंगोली जिल्ह्यात प्रथमच बक्षीस योजना लागू केलेली असून, प्रथम येणाऱ्या 200 पात्र मालमत्ता धारकांना रुपये 5000/- बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. वरील बाबीनुसार शहरातील प्रत्येक घर व आस्थापनांचे सर्वेक्षण व तपासणी निवड समितीमार्फत करून त्याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा मूल्यांकन फॉर्म हिंगोली नगर परिषद कार्यालयात उपलब्ध असून, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 ठेवण्यात आलेली आहे. असे नगर परिषदे तर्फे सांगण्यात आले आहे.
कर्मचारी व नागरिक उपस्थित!
यावेळी माजीनगराध्यक्ष अनिताताई सूर्यतळ, उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर, उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, उपमुख्याधिकारी सचिन पवार, नगर रचनाकार प्रदीप मोहकर, नगर अभियंता प्रतिक नाईक, लेखापाल अनिकेत नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, स्थापत्य अभियंता स्रेहल आवटे, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, गोविंद चव्हाण, श्याम कदम, संजय दोडल, विनय साहू, संदीप घुगे, एजाज पठाण, कैलाश थिटे, राजेश डहाळे, नितीन पहिणकर, संघपाल नरवाडे, कमलेश इंगळे, पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे, देवीसिंग ठाकूर, विजय रामेश्वरे, दिनेश वर्मा, संदीप गायकवाड, दिनकर शिंदे, प्रताप भूजवने, अथर्व वर्मा, गजानन जगताप, वर्धमान सोनटक्के, कुणाल कांबळे, रवी जोंधळे, आकाश गायकवाड, शेख साजिद इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते तसेच कमला नगर, छ शाहू नगर येथील नागरिक उपस्थित होते.
