पिचलेल्या शोषित मनाचा हुंकार हा आदिवासीचा साहित्याचा प्राण: प्रा. डॉ. गायकी
बुलढाणा (Tribal Literature Conference) : पुर्वीचे भिलठाणा असलेले बुलढाणा शहरात सहावे आदिवासी उलगुलानवेध साहित्य व संस्कृती संमेलन पार पडले. यावेळी आदिवासी साहित्य प्रस्थापित व्यवस्थेला नकार देवून समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय मूल्यांवर आधारीत शोषण विरहीत समाज, नवसमाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहते. असे संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. गोविंद गायकी यांनी सांगून पिचलेल्या शोषीत मनाचा हुंकार हा आदिवासी साहित्याचा प्राण असल्याचे सांगितले. तर (Tribal Literature Conference) संमेलनाच्या उद्घाटक वंदना टेटे यांनी व्यवस्थेच्या विकासाची संकल्पना आदिवासींच्या मूळावर उठली असल्याचे सांगून विकासाचा रस्ता हा थेट आदिवासींच्या साहित्याची, भाषेची व संस्कृतीची चोरी करण्यासाठी वापरला जातोय.. असा आरोप करुन आदिवासींच्या उदात्त जीवनमूल्यांची महती यावेळी विषद केली.
आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था, बल्लारपूर शाखा-बुलडाणा व जिजामाता महाविद्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सहावे आदिवासी उलगुलानवेधन साहित्य संमेलनाचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य संमेलनाचे उद्घाटन आदिवासी साहित्याचे अभ्यासक व भाषातज्ज्ञ, रांची झारखंड वंदना टेटे ह्या होत्या. (Tribal Literature Conference) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदिवासी साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. गोविंद गायकी हे होते.
स्वागताध्यक्ष म्हणून प्रशांत सोनोने, माजी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.विश्वास वसेकर-पुणे, माजी आमदार विजयराज शिंदे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त लेखक व विचारवंत डॉ.विनायक तुमराम, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रा.डॉ.सदानंद देशमुख व सुनीलकुमरे-चंद्रपूर, प्रा.डॉ.एस.एन.गवई, संगीता बारेला, व्हॉईस ऑफ मिडिया लक्ष्मीकांत बगाडे, दिलीप मोरे, विनोद डाबेराव आदींची विचारपीठावर उपस्थिती होती.
तर प्रा. डॉ. विनायम तुमराम यांनी आदिवासींचे केवळ साहित्य व संस्कृती संवर्धनाचे काम पुरेसे नसून आता थेट आदिवासींच्या अस्तित्वाचे व अस्मितेचे प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून यासाठी नव्या लढाईचा बिगुल वाजवण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत करुन, यासाठी उलगुलानवेध साहित्य संमेलन हे दिशादर्शक ठरावे, अशी भावना व्यक्त केली. तर स्वागताध्यक्ष प्रशांत सोनोने यांनी सृष्टी उत्पत्तीपासून जल व जमीनीचे मूळ मालक आदिवासी असल्याचे सांगून वन हे त्यांचे जीवन आहे, असे ते म्हणाले. अजीम नवाज राही यांनीही अशा साहित्य संमेलनातून त्या-त्या परंपरेचा वेध घेतल्या जातो, असे सांगितले. तर यावेळी अनेक पुस्तकांचेही प्रकाशन झाले. या (Tribal Literature Conference) प्रास्ताविक कुमरे यांनी केले तर संचालन रविंद्र साळवे व राजेंद्र काळे यांनी केले.
सदानंद देशमुखांना संत नामदेव पुरस्कार मिळवून देऊ
बारोमासकार सदानंद देशमुख यांना अनेक (Tribal Literature Conference) साहित्य पुरस्कार मिळाले आहे. मात्र जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अख्त्यारीत आहे तो संत नामदेव साहित्य पुरस्कार अप्राप्त आहे ते मिळवून देण्यासाठी विजयराज शिंदे यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी यावेळी राजेंद्र काळे यांनी केली. विजयराज शिंदे यांनी तो आपल्या जिल्ह्याचा हक्क असून आपण त्यासाठी फडणवीस यांचेकडे प्रयत्न करु नव्हेतर मिळवून देऊ, असे वचन विजयराज शिंदे यांनी दिले. तर जल, जंगल व जमीन हे आदिवासींचे स्त्रोत आहे तेच खरे त्याचे आधारकर्ते आहेत नाहीतर आजकाल डीजे वाजवून लोकांना मारण्याचे काम लागले आहे. आदिवासींची बासरी त्यांचे वाद्य आजही निसर्गाची भाषा शिकवितात आनंद व्यक्त करतात, असे विजयराज शिंदे यावेळी म्हणाले.