भर पावसात केला दोन तास आंदोलन
कळमनुरी/हिंगोली (Reservation Bachav Morcha) : भारतीय आदिवासी पॅंथर संघटना व आदिवासी समाजाच्यावतीने 26 सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव आंदोलनाअंतर्गत औकात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा मोर्चा लमानदेव येथून निघून मुख्य रस्त्याने करण्यात आला होता. मोर्चा तहसील कार्यालया समोर आल्यानंतर (Reservation Bachav Morcha) आंदोलनकर्ते तहसील कार्यालयासमोर हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर बसल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
धनगर समाजाच्या आरक्षण उपोषणातून पांडुरंग मेरगळ यांनी आदिवासी समाजाला अपशब्द वापरून दोन समाजात जातीय तेढ निर्माण केले त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. आदिवासी समाजाच्या (Reservation Bachav Morcha) आरक्षणात धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये, शासनाने नेमलेली सुधाकर शिंदे समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, आदी मागण्यासाठी औकात मोर्चा काढण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर विविध घोषणा दिल्या. यावेळी प्रशांत बोडखे, हरिभाऊ पिंपरे, अंबादास चिरमाडे, गुणाजी चाकोते, लक्ष्मण वानोळे, गजानन काळे, उद्धव हजारे, व्यंकट काळे, केशव गारोळे, सूर्यकांत मिरासे, कुसुम ठाकरे संगीता ढाकरेआदींची उपस्थित होती. यावेळी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला.