पतीचा मृत्यू तर पत्नीसह मुलगा जखमी
भंडार्यातील साई मंदिर रस्त्यावरील घटना
भंडारा (Truck Accident) : शहरातील साई मंदिर रस्त्यावर दि.२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. गणेश दर्शनाकरीता आलेल्या दाम्पत्याच्या मोटारसायकलला (Truck Accident) ट्रकने मागेहून धडक दिली. त्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाले. जगदिश गजानन चकोले (३६) रा. मोहाडी ता.मौदा असे मृतकाचे नाव आहे.
मौदा तालुक्यातील मोहाडी येथील मृतक जगदिश हा एका कंपनीत कामाला होता. घटनेच्या दिवशी त्याला सुटी असल्याने तो पत्नी व मुलासह भंडारा येथे गणपती पाहण्यासाठी मोटारसायकल क्र.एम.एच.४०/ए.यु.६१३६ या गाडीने पत्नी शुभांगी (२७) व मुलगा अद्विक (३) यांचेसोबत तर त्याच्या सोबत असलेल्या मित्राच्या गाडीवर मोठा मुलगा सार्थक (७) होता.
गणेशपूर येथील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर साई मंदिर रस्त्याने राजीव गांधी चौकाकडे जात असताना साई मंदिराजवळ मागेहून जाणारा ट्रक क्र.सी.जी.०७/बी.पी.९६७७ च्या चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून जगदिश याच्या मोटारसायकलला मागेहून धडक दिली. त्यात जगदिश याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले. (Truck Accident) घटनास्थळी लोकांनी धाव घेत जखमींना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. संतप्त जमावाने ट्रक चालकाला चांगलेच चोप दिले. अपघाताची नोंद भंडारा पोलिसात केली आहे.
भंडारा शहरात वाहतूक व्यवस्थेची समस्या कायम आहे. मुख्य व शहरातील अंतर्गत रस्त्यावर दुकानासमोर हातठेले व लहान व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे दुकानासमोर पाा\कगची समस्या निर्माण होत आहे. (Truck Accident) रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांची पाा\कग व व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या मध्यभागातून मोठे दोन वाहने जाताना कमालीची अडचण निर्माण होत आहे. परिणामी अपघाताचे धोके वाढलेले आहे. अलिकडे गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांनी रस्ते गजबजले असताना वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. याकडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.