निटूर (Truck Accident) : लोखंडी टॉवरचे अँगल भरून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचे समोरचे टायर फुटल्याने चालकाचा स्टेरिंग वरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. या अपघातात दोघेजण ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. (Truck Accident) जखमीला तातडीने लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यातील मसलगा पाटी येथे (Truck Accident) लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. लोखंडी टॉवरचे अँगल भरून कर्नाटकातून आलेला हा ट्रक भरधाव वेगात लातूरकडे जात होता. यावेळी या ट्रक (क्रमांक केए 35/ सी 9845) चे अचानक समोरचे टायर फुटले. यामुळे ट्रकचालकाचा स्टेरिंगवरचा ताबा सुटला व ट्रक पलटी झाला. ट्रकमधील प्रशांत काशीनाथ चिंतामणी (वय २९ वर्षे) व अशोक वैजनाथ चिंतामणी (वय ३५ वर्षे, दोघेही राहणार काळे गल्ली बस्वकल्याण जि.बिदर, कर्नाटक) या दोघांचा जागेवर मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीला तात्काळ लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मसलगा पाटीवर बसवकल्याणहून लातूरच्या दिशेने लोखंडी ॲगल घेऊन जाणाऱ्या (Truck Accident) ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडवरून खाली गेला. यात ट्रकमधील लोखंडी ॲगल केबिनवर आल्याने केबिनचा चुराडा झाला व केबिनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. घटना घडताच मसलगा येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने ॲगल बाजूला करून तिघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रूग्णालयात पाठवले.