अमरावती (Truck-Bike Accident) : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना आज मंगळवारी (ता.11) बडनेरा मार्गावरील बगीया हाॅटेलजवळ घडली. (Truck-Bike Accident) अपघतामध्ये सैय्यद अरमान उफर् पप्पू (36, गवळीपुरा, नवी वस्ती बडनेरा) हा युवक ठार झाला.
यासंदर्भात आज मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजताचे सुमारास ट्रक (क्र. एम.एच.27/बी.एक्स.88879) हा ट्रक रस्ता बांधकामासाठी डांबर घेवून जात हाेता. आज मंगळवारी सदर ट्रक दुरुस्तीसाठी बडनेरा येथे नेण्यात येत हाेता. बगीया हाॅटेल जवळील वळण रस्त्यावरून ट्रक जात असतांना ट्रकने समाेरून येणाèया दुचाकी स्वारास जाेरदार धडक दिली. (Truck-Bike Accident) धडकेमुळे दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकात अडकला हाेता. अपघातामध्ये सैय्यद अरमान याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. बडनेरा पाेलीसांना घटनेची माहीती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात येथे नेण्यात आला.
याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली आहे. (Truck-Bike Accident) दरम्यान, बडनेरा रेल्वे क्राॅसिंग जवळ रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने या मार्गावरील जड वाहतुक बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील काही जड वाहने या मार्गावरून जात असल्याने अपघात हाेत असून अशा वाहनांवर कारवाईची मागणी हाेते.