पुसद (Revenue Division) : दैनिक देशोन्नतीने दोन नोव्हेंबरच्या अंकामध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुसद तालुक्याची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने सुरू असून शासकीय निमशासकीय बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत याकरिता रेती गिट्टी मुरूम हे साहित्य नागरिकांना व शासकीय अधिकाऱ्यांना लागत आहे.
मात्र या व्यवसायामध्ये अतिशय कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळत असल्यामुळे गुन्हेगारांसह राजकीय पांढरपेशांचाही समावेश झालेला दिसत आहे. व त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा असल्याचं कळतं. यामुळे शहरातील नागरिक असुरक्षित झालेले दिसत आहेत या गंभीर बाबीची दखल घेत दैनिक देशोन्नतीने यासंदर्भात दोन नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले.
दैनिक देशोन्नतीच्या बातमीचा इम्पॅक्ट होत प्रशासकीय महसूलच्या अधिकाऱ्यांनी (Revenue Division) अवैध मुरूम ट्रक वाहन मालक अमोल रमेश बडगे त्यांचे वाहन क्रमांक एम एच 40 -7627 यामध्ये विनापरवाना दोन ब्रास मुरूम अंदाजे किंमत दहा हजार रुपये ऊस शहरातील देशमुख कॉम्प्लेक्स पुसद येथे दोन नोव्हेंबरच्या 11 55 वाजताच्या दरम्यान खाली करताना आढळून आला. सदरची कारवाई एमपी मस्के मंडळ अधिकारी,एन जे वानखेडे तलाठी यांनी केली पुढील महसुली कारवाई करिता उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल तथा तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला आहे हे विशेष.