वरोरा जवळील घटना, ट्रकची मोटरसायकलला धडक
वरोरा (Chandrapur) : आईची प्रकृती पाहून वणी येथे (Chandrapur Accident) दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मुलाचा जागीच मृत्यू तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना वणी मार्गावरील गणपती मंदिराजवळ ८ वाजेच्या सुमारास घडली. जयंत उर्फ खुशाल महादेव कातोरे (५७) रा. वणी, वरोरा येथील मूळ निवासी असून, असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी (Varora Hospital) वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
वणी येथील जयंत कातोरे हे वरोरा येथे आपल्या आईची प्रकृती पाहण्यासाठी दुचाकीने पत्नीसह आले होते. सायंकाळी वणी येथे परत जात असताना वरोरापासून २ किलोमीटर अंतरावरील गणपती मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात जयंत कातोरे यांचा जागीच मृत्यू झाला (Chandrapur Accident) तर पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर (Varora Hospital) वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.