१३ भाविक जखमी
मोठा महादेव पचमढी दर्शन करून येत असताना अपघात
मानोरा (Manora Accident) : तालुक्यातील गव्हा व हळदा या गावातील काही भाविक पचमढी (मध्य प्रदेश) येथे दर्शन साठी गेले असता गेले होते. दर्शन आटोपून घरी परत येत असताना मंगरूळपीर ते मानोरा रोडवर कोलार फाट्याजवळ भाविकांनी भरलेला आयशर ट्रक हा टू व्हीलरला वाचवण्याच्या नादात पलटी होऊन त्यामध्ये १२ ते १३ भाविक जखमी झाल्याची (Manora Accident) अपघाताची घटना दि. २८ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजताच्या घडली.
सदरील अपघाताची (Manora Accident) माहिती तात्काळ गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी मानोरा लोकेशनचे पायलट लक्ष्मण चव्हाण यांना दिली त्यांनी तात्काळ पायलट सुरेश पवार, डॉक्टर दीपक पवार हे घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे आणले. व तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार केले.
अपघातातील (Manora Accident) जखमी ललिता खोडे वय ४०, जानू सिंग चव्हाण वय ५९, वैभव पवार वय २५, प्रकाश वडवे वय ३२, रुपेश माकोडे वय ३६, लखन राठोड वय १६, गोपाल खोडे वय ३६, संदीप खोडे वय ३७, बेबी आवारे वय ५०, किसन आवारे वय ५५, प्रमोद ठाकरे वय ५०, शिवम राऊत वय १८, संदीप जगताप वय ४५ हे सर्व जखमी तालुक्यातील काही गव्हा व हळदाचे रहिवासी आहेत. अशी माहिती मिळाली आहे.