दोन्ही बाजूंनी ट्रक रांगा लागल्या होत्या, त्यामुळे 24 तास वाहतुक ठप्प
कोरची (Korchi bypass road) : छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या मालवाहू ट्रक (Korchi Tehsil) कोरची शहरातील तहसील ऑफिस (bypass road) टी पॉइंट वळणावर काल रात्री बारा वाजेपासून आजपर्यंत एका मोठ्या खड्ड्यात अडकलेला आहे त्यामुळे त्यामुळे प्रकारांचे रांगा लागल्यात आहेत. सदर कोरची बायपास मार्ग हा छत्तीसगड राज्याला जोडलेला आहे. या महामार्गाने 24 तास चंद्रपूर वरून रायपुर, रायपूर वरून हैदराबाद ,सुरजागड वरून रायपुर ,ला जाणारी अनेक मालवाहू ट्रकांची वाहतूक सुरू असते.
मुख्य म्हणजे कोरची वरून गोंदिया जिल्ह्यात जाणारा हाच सरळ महामार्ग असून, या मार्गावरील वळणावरच्या टी पॉईंट तहसील बायपास मार्ग असून येथील पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात रस्त्याच्या मध्यभागी मालवाहू ट्रक अडकल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे .तर अनेक वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने बाहेर काढावी लागत आहेत मंगळवार घ्या रात्रोपासुन बुधवारी सायंकाळी 7 पर्यंत छत्तीसगड वरून हैदराबादला निघालेला ट्रक येथेच अडकून पडलेला होता. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता बळावली आहे .कोरची तहसील बायपास मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी जीव घेणारे मोठे मोठे खड्डे पडले आहेत.
मागील एक वर्षांपूर्वीच या रस्त्याचे नवीन बांधकाम करण्यात आले होते ,परंतु सहा महिन्यातच हा बायपास रस्ता पूर्णपणे उकडलेला आहे सध्या Korchi Tehsil) कोरची बायपास तहसील टी पॉईंट ते नवरगाव पुढील काही अंतरापर्यंत या रस्त्याची समते पेक्षा जास्त टन मालवाहु ट्रक जाऊन होऊन अनेक ठिकाणी खड्डे पडले(ले आहेत. मंगळवार ला रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज घेता येत नसल्यामुळे वाहने खड्ड्यात अडकत आहेत तर यापूर्वीच या महामार्गावर अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या बायपास मार्गाची संबंधित विभागाने दुरुस्ती न करता नव्याने मजबूत बांधकाम करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रस्तुत प्रतिनिधी यांनी फोन लावले असता संपर्क होऊ शकला नाही. कुरखेडा तालुक्यात तुन कढोली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था धान्य खरेदी केलेला ट्रकमध्ये धान्य घेऊन छत्तीसगड मध्ये जाणारा ट्रक क्रमांक CG 07 CB0487. बिघाड झाल्याने कोरची नवरगाव रस्तात्यावर अटकला ट्रक चालक जोशी यांना प्रस्तुत प्रतिनिधी विचारले असता धान्य छत्तीसगड घेऊन जात आहे अशी प्रतिक्रिया दिली.
दुसरा सुरजागड वरून रायपुर असतानी कोरची नवरगांव ट्रक रस्त्याच्या कडेला ट्रक क्रमांक MH 34 BZ11891 फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. आदिवासी विकास महामंडळाकडून दिलेल्या वाहतूक परवानानुसार धान्य ट्रक मध्ये भरून देणे व धरम काट्यापर्यंत वजन करणे ही आमची जबाबदारी आहे त्यानंतर ते धान्य कुठे जातात याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही
– नरेंद्र पटणे, व्यवस्थापक आदिवासी विविध कार्यकारी संस्था कढोली