तुमसर-तिरोडा मार्गावर देव्हाडी येथील घटना
तुमसर (Tumsar Accident) : तुमसर-तिरोडा मार्गावर स्टेशन टोली देव्हाडी येथे एका धाब्यासमोर दि. १३ जून रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान (Tumsar Accident) भीषण अपघात घडला. चुकीच्या बाजूला रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर मोटारसायकल आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पती-पत्नीसह दोन वर्षीय मुलगी जखमी झाली. मृतकात चार वर्षीय बालकाचा समावेश आहे. सुलीचंद द्वारकाप्रसाद सिनवाने (६०) रा.चुरडी ता.तिरोडा व विहान दिनेश दशमेर (०४) रा.सालेवाडा (वाराशिवणी), असे मृतकाचे नाव आहे.
अपघातात दोन ठार, तीन जखमी
जखमीमध्ये दिनेश उत्तम दशमेर (३०), सरिता दिनेश दशमेर (२५), रिग्राशी दिनेश दशमेर (०२), सर्व रा.सालेवाडा (वाराशिवणी), अशी जखमींची नावे असून दिनेश दशमेर याचेवर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरु आहे. दि.१३ जून रोजी दुपारी मृतक व जखमी हे (Tumsar Accident) मोटारसायकल गाडीने तिरोडा तालुक्यातील चुरडी येथून तुमसरकडे येत असतांना (Tumsar Police) स्टेशनटोली देव्हाडी येथे शाम धाब्यासमोर चुकीच्या बाजूला रस्त्यावर उभा असलेला ट्रेलरवर मागेहून मोटारसायकल आदळली. त्यात सुलीचंद सिनवाने व चार वर्षीय विहान दशमेर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दिनेश दशमेर, पत्नी सरिता दशमेर व दोन वर्षीय मुलगी रिग्राशी जखमी झाले.
मृतकात चार वर्षीय बालकाचा समावेश
अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराकरीता (Tumsar Hospital) उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले. मात्र दिनेश दशमेर या जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. तर जखमी सरिता दशमेर व किरकोळ जखमी रिग्राशी यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. अपघाताची माहिती तुमसर पोलीसांना मिळताच पोउपनि गित्ते यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास (Tumsar Police) पोउपनि गित्ते करीत आहेत.