तुमसर (भंडारा) :- कोंबड्या भरुन भरधाव वेगाने जात असलेल्या चार चाकी पिक अप वाहनाने विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला (Two wheeler) आमोरा समोर जोरदार धडक दिली असता दुचाकीचालक जागीच ठार (Death)झाला.तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना ४ आगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान तुमसर-गोबरवाही मार्गावरील चिचोली बस स्टाप जवळ घडली. आकाश मरस्कोल्हे (२२) दुर्गा चौक रा.चिखला.असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.तर यादव मेडिया (२५) व करण राहुते (२४) असे गंभीर जखमी असलेल्या युवकांचे नाव आहे.
तुमसर -गोबरवाही मार्गावरील चिचोली बस स्टॉप जवळील घटना
आकाश आपल्या दुचाकीने दोघ्या मित्रा समवेत ट्रिपल सिट दुचाकी क्रमांक एम. एच ३६ ए .जे ७०८४ या क्रमांकाच्या दुचाकीने तुमसर वरुन गोबरवाही मार्गे स्वगावी चिखला येत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोंबड्या भरलेल्या भरधाव चार चाकी वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली त्यात दुचाकी चालक आकाश मरस्कोल्हे हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेले यादव मेडिया व करण राहुते दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात होताच नागरीकांनी पिक अप चार चाकी वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. सदर घटनेची माहिती तुमसर पोलीसांना मिळताच तुमसर पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचानामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.व जखमींना भंडारा रुग्णालयात रेफर करण्यात आले.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगवानी करीत आहेत.
जखमी करण च्या वाढदिवशीच मित्र आकाशचा मृत्यू
दुचाकी चालक आकाश मरस्कोल्हे हा मित्र करण राहुते व यादव मेडिया सोबत ट्रिपल सिट चिखला वरुन तुमसरला करणच्या वाढदिवसाचे साहीत्य घेण्यासाठी आले होते. तिघेही एकमेका़चे सख्ये मित्र होते. सदर साहित्य घेऊन तुमसर वरून स्वगावी चिखला येथे मित्र करणचा वाढदिवस (birthday) साजरा करण्यासाठी जात असताना तुमसर -गोबरवाही मार्गावरील चिचोली बस स्टाप जवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव पिक अप ने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. त्यात आकाश हा मित्र ठार झाला तर करण व यादव हे दोघे जखमी झाले . सदर अपघातात मित्राच्या वाढदिवशीच एक मित्र ठार झाला. तर दोघे जखमी झाले. मित्र करणच्या वाढदिवशीच आकाशचा मृत्यू झाल्याने जखमी करण व यादव हे दोघही गहीवरले असुन मित्राच्या वाढदिवशी चिखला गावात शोककळा पसरली आहे.